आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार जे आक्षेपार्ह बोलले, त्याचे मी समर्थन करणार नाही. उलट कोणत्याही महिलेचा असा अपमान व्हायला नको, असे माझे मत आहे. परंतु, सुळे यांना कोणी काही बोलले, तर त्यांचा अपमान होतो. मग, इतर महिला काय रस्त्यावर पडल्या आहेत काय? त्यावेळी कोणी काहीच कसे बोलत नाही, असा संतप्त सवाल अमरावती येथे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला.
अमरावतीत भाजप महिला मेळाव्याला आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारने शहानिशा न करताच केतकी चितळेला एक महिना तुरुंगात टाकले. तिच्या आई-वडिलांना जाऊन भेटल्यानंतर त्यांची अवस्था मला बघवत नव्हती. वास्तविक केतकीने ते लिहिलेच नव्हते. तिला यात अडकवण्यात आले. स्वप्ना पाटकर तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्यांना किती घाणेरड्या शिव्या दिल्या. त्यावेळी महाराष्ट्राचा अपमान झाले, असे कोणी म्हटले काय? कंगना रनौतचे घर पाडण्यात आले. त्यानंतर ‘उखाड के फेक दिया’ असे म्हटले गेले. तेव्हा सर्व शांत का होते.
राठोडविरोधात माझी पीआयएल
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांनी पूजा चव्हाण या युवतीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या विरोधात मी त्यावेळी न्यायालयात पीआयएल दाखल केली. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड मंत्री असले तरी माझी भुमिका बदलली नाही, असेही वाघ म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.