आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवनीत आक्का तुम्ही कधीच चांगल्या अभिनेत्री नव्हता. तिकडे तुमचे बॉक्स ऑफिसवर काहीच चालले नाही. त्यामुळे तुम्ही इकडे आला. नवनीत आक्का तुम्ही कधीच चांगल्या वक्त्या नव्हत्या. त्यामुळे तुम्हाला अशी स्टंटबाजी करावी लागली, अशी घणाघाती टीका ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. राणा दाम्पत्य नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. त्यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवनीत राणांचा आक्का असा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी राणांची खिल्ली उडवली आहे.
नीट ध्यानात ठेवायचे
सुषमा अंधारे म्हणाल्या, सगळे ज्यांच्याविरोधात कामाला लागले असतानाही जो हटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते. हनुमानचालीसेचे जे नाटक तुम्हाला मंत्रीपदासाठी करावे लागले, ज्या मातोश्रीसमोर तुम्ही ही नाटके केलीत, त्याच मातोश्रीत राहणाऱ्या वाघाला उद्धव ठाकरे म्हणतात. तर आता उद्धव ठाकरेंवर बोलताना टीका करतांना नीट ध्यानात ठेवायचे MIND IT, असा इशारा सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांना दिला.
स्टंटबाज व नौटंकीबाज
सुषमा अंधारे म्हणाल्या, जर नवनीत राणा यांना वाटत असेल. त्या फार हुशार आहेत. सुंदर अॅक्टर आहेत. तर नवनीत राणा यांनी हे गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचे बॉक्स ऑफिसवर काहीच चालले नाही म्हणून तुम्ही बोगस जात प्रामाणपत्र बनवून इकडे आल्या. तुम्ही चांगल्या राजकारणी नाही अन्यथा बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, असा टोला सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा लगावला. राणा दाम्पत्य हे बशीतले कपात आणि कपातले बशीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.