आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चोरीचा संशय घेतला म्हणून खून!:पाळत ठेवून संतोष पछेल यांचा चिरला गळा; छातीवर वार, अमरावतीत खळबळ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरात दागिन्यांची चोरी झाली आणि त्याचा संशय आपल्यावर घेतला या रागातून तरूणाने एकाचा खून केला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघांना गुरूवारी (ता. 2) रात्री उशिरा अटक केली. तर एका अल्पवयीनाला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले.

तिघांना ठोकल्या बेड्या

भानखेडा मार्गावर गुरूवारी (ता. 1) सांयकाळी सात वाजताच्या सुमारास संतोष ऊर्फ पापा किशोर पछेल (42) यांचा खून झाला होता. यानंतर पोलिसांनी​​​​​​ मुकेश सुभाष मारवे (25, रा. सुदर्शनगनर), निखील शैलेश परिहार (18, रा. किशोरनगर) आणि सौरभ रवि गाडेकर (18, रा. स्विपर कॉलनी) यांना पोलिसांनी अटक केली.
काय आहे प्रकरण?

या प्रकरणी संतोष पछेल यांचे जावई दिनेश किशोर गवतेल (40, रा. सुदर्शननगर, अमरावती) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. काही महिन्यांपुर्वी संतोष पछेल यांच्याकडे दागिन्यांची चोरी झाली होती. तशी तक्रारसुद्धा संतोष पछेल यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली होती. दरम्यान मुकेश मारवेनेच त्याच्या तीन मित्रांसह आपल्या घरात चोरी केली, असा दाट संशय पछेल यांना होता. याच कारणावरुन संतोष व मुकेश यांच्यात यापुर्वी वादही झाला होता.

वाद नको, घातली समजूत

31 ऑगस्टला संतोष पछेल यांनी दिनेश गवतेल यांना सांगितले होते कि, मुकेश मारवे, निखील परिहार, सौरभ गाडेकर व अन्य एक अल्पवयीन हे वाद घालत आहे. त्यावेळी गणपती उत्सवाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे वाद करु नका, असे त्यांनी सांगितले होते, ते एकूण संतोष पछेलही शांत हाेते.

असा केला खून

संतोष पछेल हे दरदिवशीच सांयकाळी भानखेडा मार्गावर फिरण्यासाठी जात होते. हे मुकेश मारवेलासुद्धा माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या ईतर तीन सहकाऱ्यांसह कट रचला. एकाच दुचाकीवर हे चौघे भानखेडा मार्गाने गेले. त्यावेळी संतोष पछेल त्या भागात होतेच. संधी मिळताच चौघांनीही चाकूने संतोष यांच्या शरीरावर वार केले. यामध्ये संतोषचा गळा चिरुन छातीवरसुध्दा वार करण्यात आले. यावेळी मारेकऱ्यांनी संतोषच्या छातीत चाकू खूपसुन घटनास्थळावरुन पळ काढला.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

तक्रार प्राप्त होताच फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, पेालिस निरीक्षक नितीन मगर, पीएसआय गजानन राजमल्लू यांनी पथकाच्या मदतीने अवघ्या तीन तासात चौघांनाही ताब्यात घेतले. त्यापैकी एक अल्पवयीन असल्यामुळे ईतर तिघांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...