आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सालोड (कसबा) ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचासह इतर तीन सदस्यांचे पद रद्द करण्याच्या विभागीय आयुक्ताच्या आदेशाला शुक्रवार, १६ डिसेंबरला स्थगिती देण्यात आली आहे.
त्यांच्यावर सरकारी जागा नियमबाह्य ठराव घेतल्या प्रकरणी अपात्रतेची कारवाई केली होती. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड कसबा ही ९ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या निवडणुकीत हे संख्याबळ गठीत केले होते. मात्र, तक्रारदार सुनील इंझळकर यांनी अमरावती येथील विभागीय आयुक्तांकडे सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी सरकारी, ग्रामपंचायतीच्या जागा नियमबाह्य ठराव मंजूर करून अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार केली होती.
दरम्यान विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ (१) चा संदर्भ देऊन ही कारवाई करत त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी हा आदेश दिला होता. सरपंच रोशना ढगे, उपसरपंच अब्दुल कादर शेख अहमद, सदस्य भारती राऊत, सुनीता राऊत व राजेंद्र तिवसकर यांच्या अपात्र ठरवण्याचा आदेशाला ग्रामविकास मंत्रालयाच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
प्रशासक नेमण्याची बीडीओंकडे मागणी
विभागीय आयुक्तांच्या या निकालामुळे तब्बल ५ सदस्य अपात्र ठरवण्यात आल्याने आता ग्रामपंचायतीमध्ये केवळ चार सदस्य शिल्लक राहिले. त्यामुळे आता सत्ताधारी गट अल्प मतात गेला असून विरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सालोड कसबा येथे तत्काळ प्रशासक नेमावा, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.