आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह जिल्ह्यात गैरकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरी सेंटरवर कारवाई करावी, अशी मागणी करत महानगर कॉग्रेस समितीने वस्तू सेवा कर उपायुक्तांना निवेदन दिले. काही वर्षापासून ऑनलाइन लॉटरी सेंटरमार्फत एकाच क्रमांकाचा जीएसटी सर्वच ऑनलाइन लॉटरी सेंटरवर वापरला जातो. ऑनलाइन लॉटरी सेंटरला २८ टक्के जीएसटी असताना अशा बनावट जीएसटीच्या नावावर राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कराची चोरी होत आहे. सार्वजनिक ठिकाणी परवानगी नसताना ऑनलाइन लॉटरीचा धंदा सुरू आहे. ऑनलाइन लॉटरी सेंटरला शासनाची मान्यता नाही.
ऑनलाइन लॉटरीचे बेरोजगार तरुणांना व्यसन जडले आहे. त्यामुळे युवकांचे भविष्य खराब होत आहे. परिणामी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. एका ऑनलाइन लाॅटरी सेंटरवर एका दिवसाला दोन लाखांची तिकीट विक्री होते. अशा प्रकारे महिन्याला ५० ते ६० लाख विक्रीवर २८ टक्के जीएसटी नुसार १४ ते १५ लाख महिना यानुसार शासनाचा जीएसटी बुडवला जात आहे. शहरात ३० ते ४० ऑनलाइन सेंटर आहेत. याकडे अधिवेशनात आमदार दिलीप लांडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. हे लक्षात घेवून ऑनलाइन लाॅटरी सेंटरवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातू
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.