आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्करी:वाळू तस्करांवर तातडीने कठोर कारवाई करा ; शहानूर नदीतून वाळू उत्खनन

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विहिगाव येथील शहानूर नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू तस्करीसह तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विहिगाव येथील दक्षता समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शांतता समितीची सभा सरपंच जयश्री पोटदुखे यांच्या अध्यक्षतेत व सदस्यांच्या उपस्थितीत विहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. वाळू तस्करीबाबत नागरिकांच्या तक्रारी सरपंच तथा दक्षता समितीच्या सदस्यांना प्राप्त होत आहेत. त्यावर चर्चा करून महसूल व पोलिस प्रशासनाकडे दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही केली. विशेष म्हणजे रोहयोअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची पार वाट लागली आहे. त्यालगत हिंदू स्मशानभूमी असून त्यामधील मृतदेह सुद्धा उघडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेचे खेळाचे मैदान व विहिगाव नेते सातेगाव रस्ता या उत्खननामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शेत पूर्णपणे खोदण्यात आले असून, याच ठिकाणी उत्खनन करताना एक व्यक्ती मरण पावली होती. याची तक्रार सरपंच तथा दक्षता समितीने घेतली असून याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, दर्यापूरचे एसडीपीओ, तहसीलदार, रहिमापूरचे ठाणेदार यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रशासन आता वाळू माफियांवर कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...