आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशस्त्रक्रियेदरम्यान चूक करुन महिलेला दीर्घकाळासाठीच्या यातना पोहोचवणाऱ्या डॉक्टरवर कारवाईसाठी टायगर ग्रुप व ध्येय मल्टिपर्पज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले.
निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांना सादर केलेल्या निवेदनानुसार, या डॉक्टरने भारती मोहोकार या महिलेची शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केला. त्यांच्या त्या हलगर्जीपणामुळे या महिलेला दीर्घकाळासाठी च्या यातना झाल्या असून, अजूनही त्यांची प्रकृती पूर्ववत झाली नाही. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी अक्षम्य चूक केली. तक्रारीनंतर वैद्यकीय शाखेने थातूर-मातूर चौकशी केली. परंतु वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एवढे झाल्यावरही त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द का करण्यात आला नाही. त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरु केल्यामुळे भविष्यात आणखी काही रुग्णांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो, असे या संघटनांच्या निवेदनाचे म्हणणे आहे.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शिरभाते, सचिव वैभव बिजवे, इतर पदाधिकारी अभि राज येवतीकर, गणेश कोहळे, राणा येवतीकर, वरद लढ्ढा, श्री नाथ पांडे, साहिल गुप्ता, आलोक यादव, सर्वेष बिंड, वेदांत देशमुख, अभय भेेंडेकर, क्रिश वाकपांजर, प्रतीक धोपडे, आदित्य रोने, निखिल चोकसे, सागर शिरभाते, निखिल बिजवे, कोमल मानापुरे, जागृती मानमोडे, कुणाल बिजवे, आकाश येवतीकर, अनुप फरतोडे, संजय श्रीराव, शंतनू भालेराव, पियुष येवतीकर, सौरभ पाचंगे, भारत लडिया, श्रेयस राऊत, शुभम पांढरे, ओम गोटे, ऋषिकेश पंडित, स्वप्नील मेश्राम, ऋत्विक थोरात, ओम राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.