आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:चार हजार रूपयांची लाच‎ घेताना तलाठी गजाआड‎ ; लोहारा येथे तलाठी कार्यालयात ‘ एसीबी’ची कारवाई‎

अकोला‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतजमीनीचे हिस्सेवाटणी‎ करण्यासाठी चार हजारांची लाच‎ घेताना डोंगरगाव येथील‎ तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाने अटक केली. ही कारवाई‎ शुक्रवारी करण्यात आली. राजेश‎ महादेव शेळके (वय ५३, रा. संजीव‎ नगर, कोठारी वाटिका क्रमांक ६ च्या‎ मागे अकोला) असे लाचखोर‎ तलाठ्याचे नाव आहे.‎ तक्रारदार यांचे डोंगरगाव येथील‎ वडिलोपार्जित शेतजमिनीचे समान‎ हिस्से वाटणीच्या अनुषंगाने बाळापूर‎ तहसीलदार यांना अनुकूल अहवाल‎ पाठवल्याच्या मोबदल्यात तसेच‎ फेरफार नोंद करून वेगवेगळे‎ सातबारा देण्याकरीता दहा हजार‎ रूपयांच्या लाचेची मागणी करून‎ अॅडव्हासच्या स्वरूपात लोहारा‎ येथील तलाठी कार्यालयात राजेश‎ शेळके याने चार हजार रूपये‎ स्वीकारले. त्याला एसीबीच्या‎ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.‎ त्यानंतर त्याच्याविरूद्ध उरळ पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही‎ कारवाई पोलिस उपअधीक्षक‎ यु.व्ही. नामवाडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...