आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालये बंद:राळेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणची‎ तलाठी कार्यालये बंद अवस्थेत‎

राळेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाने मागील काही‎ वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी तलाठ्याचे मुख्यालय‎ उभारले असून शेतकऱ्यांना वेळोवेळी होणाऱ्या‎ अडचणीचा सामना करावा लागणार नाही.‎ शेतकऱ्यांना तलाठ्यांकडून घरपोच कार्यालयीन‎ कागदपत्रे मिळण्याच्या दृष्टीने जवळपास प्रत्येक‎ गावात तलाठी कार्यालय उभारले आहे.

काही‎ गावांतील तलाठी वगळता बरेचशे तलाठी आपला‎ कारभार तालुक्यातील कार्यालयातून पाहत‎ असल्याने शासनाने मुख्यालयासाठी केलेला खर्च‎ कुचकामी ठरत आहे. प्रत्येक गावातील शेतकरी‎ बांधवांना वेळेवर सेवा मिळावी यासाठी तलाठी‎ कार्यालय नियमित सुरु करण्यात यावे, अशी‎ मागणी तालुक्यातील शेतकरी बांधव करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...