आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्हा पोळा:शेंदुरजानाघाट येथे जनता स्कूलमध्ये तान्हा पोळा

शेंदुरजनाघाट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित जनता इंग्लिश स्कूलमध्ये तान्हा बैलपोळा उत्साहात पार पडला. सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षकांच्या हस्ते परीक्षण करून प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिवाय तीन प्रोत्साहनपर बक्षीसेही देण्यात आली.

विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सतीश सोलव, सचिव मोहन गणोरकर, संचालक अरुण फुटाणे व राजेंद्र बेलसरे, प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री आंडे उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून सुष्मिता सावरकर, सविता सावरकर व डॉ. करूणा आंडे यांनी जबाबदारी पार पाडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. सर्व छोट्या मुलांनी शेतकऱ्यांना साजेशी परंपरागत वेशभूषा करून बैल सजवून आणले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा शिंगरवाडे यांनी केले. तर आभार पूनम वऱ्होकर यांनी मानले. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका जयश्री आंडे यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली.

बातम्या आणखी आहेत...