आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांना निवेदन:‘विद्यापीठ ते वडाळी ओव्हर ब्रिज चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करा’

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठ ते वडाळी ओव्हर ब्रिज चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण अनेक वर्षांपासून झाले नाही. त्यामुळे हा रस्ता पाच ते सहा फुटांचा झाला आहे. या मार्गावर महाविद्यालय, शासकीय कार्यालय, नागरी वस्ती असल्यामुळे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण तत्काळ करावे, या मागणीसाठी सुरेश तायडे मित्रपरिवार ग्रुपच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, विद्यापीठ, दंत महाविद्यालय ते वडाळी ओव्हर ब्रिज चौकापर्यंतचा रस्ता हा छोटा आहे. त्याची रुंदी ही पाच ते ६ फूट आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्याचे काम केले नाही. या रस्त्यावर नागरी वस्ती, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालय असल्याने वर्दळ असते. रस्ता छोटा असल्याने किरकोळ अपघातही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना येजा करण्याकरिता त्रास होत आहे. नागरिक मनपा प्रशासनाला टॅक्स देतो. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेता या रस्त्याची रुंदी व लांबी वाढवून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सुरेश तायडे मित्रपरिवार ग्रुपने निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...