आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पहार अर्पण करून अभिवादन:वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

वनोजा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्था व्दारा संचालित श्रीमती. साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ ला शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रकाश लहासे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा उलगडा केला. कार्यक्रम‌अधिकारी प्रा. बापूराव‌ डोंगरे यांनी कार्यकर्माचे संचालन केले. या कार्यक्रमाला डॉ. गजानन घोंगटे, प्रा. दीपक भगत, लेफ्टनंट सुनील बोरचाटे प्रा. राधिका सावके, प्रा चेतन महल्ले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, गणेश राऊत, गजानन बायस्कार, ज्ञानेश्वर मिसाळ, अशोक इंगोले, संजय गांजरे यांनी देखील सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. या‌ कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनात‌ पार पडला.

बातम्या आणखी आहेत...