आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण:श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, तर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत, महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. पी. एस. सायर, डॉ. उल्हास देशमुख, डॉ. पुष्पलता देशमुख उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन तसेच माल्यार्पण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...