आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाची हाक:शालेय पोषण आहार, अतार्किक कामांविरुद्ध८ ऑगस्टला शिक्षकांचे जि. प. समोर धरणे

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांवर सोपवण्यात आलेल्या अतार्किक कामांविरुद्ध शिक्षकांनी एकजूट केली असून आगामी ८ ऑगस्टला जिल्हा परिषद मुख्यालयावर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जि.प. च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरु होईल.

संघटनेच्या मते सरकार विद्यार्थी व शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या जागांचा विपरीत परिणामही अध्ययन-अध्यापनावर होत आहे. केंद्र प्रमुखांच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार अनेक जिल्ह्यात मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम होत असून गुणवत्ता वाढीसाठी तो मोठा अडथळा आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांला गणवेश देण्याची घोषणा केली होती. परंतु ती हवेतच विरून गेली आहे. जुनी पेन्शन, शिक्षण सेवकांचे मानधन, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, बदली प्रक्रिया रेंगाळणे, वेतन त्रुटी, पदवीधर वेतनश्रेणी, पूर्वाश्रमीचे वस्तीशाळा शिक्षक अशा विविध मागण्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर खूपच औदासीन्य आहे. या सर्व मुद्द्यांना धरुन हे आंदोलन केले जाणार आहे.

गेली दोन वर्षे शिक्षकांनी कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून विविध कामे पार पाडली. मात्र, विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कर्तव्य भावनेने पुढाकार घ्यावा, असे अवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे, प्रसिद्धिप्रमुख राजेश सावरकर, न.पा.-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...