आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा विज्ञान हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवे, परंतु त्यासाठी ते वैज्ञानिक परिभाषेतून बाहेर काढून सोप्या शब्दांमध्ये मांडणे आवश्यक आहे आणि हीच विज्ञान प्रसारकांची मोठी जबाबदारी आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी व्हावा व त्यातून मोठ्या प्रमाणात समाजहित साधले जावे हेच आहे, असे प्रतिपादन प्रदर्शन कक्षाचे उद््घाटक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रकांत रागीट यांनी केले.
अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेल्या तंत्रविषयक आविष्काराला एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या वतीने सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. ७) डीपेक्स-२०२३ प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदर्शनीच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिती सावजी, अनुराधा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विजय गरकल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अमरावती महानगर अध्यक्ष डॉ. श्याम मुंजे, महानगर मंत्री सावनी सामदेकर उपस्थित होते. अभियांत्रिकी,विज्ञान , कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेल्या तंत्रविषयक आविष्काराला एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी १९८६ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या वतीने डिपेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. हे डिपेक्स आयोजनाचे ३२ वे वर्ष आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि. ९) होईल.
डिपेक्स प्रदर्शनामध्ये हजारो विद्यार्थी प्रत्येक वर्षी सृजनशीलता तसेच तांत्रिक ज्ञान प्रकल्पांच्या माध्यमातून आपले कौशल्य प्रदर्शित करीत असतात. प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान तसेच कृषी क्षेत्रातील पदविका आणि पदवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले असून त्यामध्ये या वर्षी २५० पेक्षा अधिक तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी व कृषी विज्ञान महाविद्यालयातील चलप्रतिकृतीसह १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे. प्रदर्शनाच्या कक्ष उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन महानगर मंत्री सावनी सामदेकर, तर आभार महानगर अध्यक्ष डॉ. श्याम मुंजे यांनी मानले. या प्रसंगी मोठ्या संख्येने प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.
२५० प्रतिकृतींसह हजारावर विद्यार्थी सहभागी प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान तसेच कृषी क्षेत्रातील पदविका आणि पदवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले असून त्यामध्ये या वर्षी २५० पेक्षा अधिक तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी व कृषी विज्ञान महाविद्यालयातील चलप्रतिकृतीसह १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे.अभाविपद्वारे ध्वजारोहण या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत अध्यक्ष प्रा. नितीन गुप्ता, प्रांत मंत्री शक्ती केराम, अमरावती महानगर अध्यक्ष डॉ. श्याम मुंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.