आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांची नोंदणी:सी सॅटच्या काठिण्य पातळीने स्पर्धा परीक्षार्थींची कसोटी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससीच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर दोनमधील सी सॅटच्या काठिण्यपातळीने उमेदवारांची चांगलीच कसोटी लागली. सी सॅटच्या तुलनेत सामान्य अध्ययनाचा पेपर (जीएस) सोपा गेल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थींनी दिल्या. नाशिकमधील ३२ केंद्रांवर १२ हजार ३८३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ हजार ८१३ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले होते. तर ३५६९ उमेदवारांनी रविवारी (दि.२१) झालेल्या परीक्षेला दांडी मारली. सकाळी १० ते १२ या वेळेत सामान्य अध्ययनाचा पेपर घेण्यात आला. तर दुपारी तीन ते पाच या वेळेत सी सॅटचा पेपर झाला. परीक्षेसाठी ११४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२२ च्या जाहिरातीमधील जागांमध्ये तब्बल ३४० विविध संवर्गातील पदांची भरती झाल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी या ‘गट अ’ संवर्गातील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...