आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भारतीय बेरोजगार मोर्चाचे अमरावती विद्यापीठावर थाळी बजाओ आंदोलन; यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठातून पदवी घेऊन युवा वर्ग मोठ्या संख्येने बाहेर येतो. मात्र, त्याला रोजगार मिळत नाही. त्यामुळे लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक युवती आत्महत्या अथवा वाईट मार्गाकडे वळतो आहे. त्यामुळे देशाचे भविष्य अंधाराकडे वळले असल्याचे भारतीय बेरोजगार मोर्चाचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन जागे व्हावे, वयासाठी मंगळवारी संघटनेच्या नेतृत्वात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली.

भारतीय बेरोजगार मोर्चाने निवेदनात म्हटले की, कोरोना काळात अनेक उद्योग, रोजगार बंद पडले. त्यामुळे युवकांच्या हातातले रोजगार गेले. एनसीआर बीच्या रिपोर्ट नुसार देशात दररोज देशात ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या संदर्भात कोणताही पक्ष संघटना आवाज उठवत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय बेरोजगार मोर्चा या विरोधात टप्प्या टप्प्यात आंदोलन उभे केले आहे.

वाढती बेरोजगारी तसेच केंद्र आणि राज्य शासना विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी अमरावती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोर थाळी वाजवून शासनाचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणा दिल्या.यावेळी प्रफुल गवई, रेणुका कटकतलवारे, माधुरी भंडारे, वैशाली वानखडे, रोहित रोकडे, अमित लांजेवार, अमित बनसोड, सचिन मोहोड, चंद्रशेखर तायडे, विवेक कडू, बाबा मोहोड, अॅड. सुनील डोंगरदिवे, विशाल डोंगरदिवे, उमेश कांबळे, रंजना चव्हाण, तुषार शेंडे, करण तंतरपाळे, सोनल ढोकने, आनंद ढोकणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...