आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:17 वर्षीय मुलाचा अत्याचार; 13 वर्षाची मुलगी गर्भवती, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एका १७ वर्षीय मुलाने तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. यातूनच त्या मुलीला गर्भधारणा झाली. हा धक्कादायक प्रकार राजा पेठ ठाण्याच्या हद्दीत नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी राजा पेठ पोलिसांनी २० जूनला १७ वर्षीय मुला विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरात राहणाऱ्या पिडीत तेरा वर्षीय मुलीला तिच्या पालकांनी रुग्णालयात आणले होते. यावेळी मुलीला सुमारे १९ आठवड्यांची गर्भधारणा झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावेळी उपचार करण्यासोबतच डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती राजा पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालय गाठले व मुलीला विचारपूस केली.

मात्र,मला गर्भधारणा कशी झाली, हे मलाच माहीत नाही, असे वारंवार मुलगी पोलिसांना सांगत होती. त्यामुळे पोलिसांसमोर ही सुरूवातीला पेच निर्माण झाला होता. त्यामुळेच राजा पेठ पोलिसांनी संशयिताविरुद्ध २० जूनला गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी दीड दिवस सखोल तपास केला असता मुलीच्या परिचित एक सतरा वर्षीय मुलगा होता. त्यानेच या मुलीवर अत्याचार केल्याचे पुढे आले व तपासात पीडीत मुलीने सुद्धा तसे सांगितले, अशी माहिती राजा पेठ पोलिसांनी दिली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यामुळे हा सतरा वर्षीय मुलगा पसार झाला आहे.