आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:प्रशासन कुणाचा बळी जाण्याची पाहतेय वाट ; बोपापूर, सुलतानपूर शेतशिवारातील विद्युत डीपी ठरतेय धोकादायक

परतवाडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील बोपापूर, सुलतानपुरा रस्त्यावरील महाजन विद्युत डीपीचे खांब जीर्ण झाल्याने जमिनीतून उखडला आहे. त्यामुळे ही विद्युत डीपी कधीही कोसळू शकते. त्यामुळे जीवित हानीचा धोका निर्माण झाला आहे. कोसळण्याच्या अवस्थेत आलेल्या डीपीला मजबूत उभारणी द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, तर दुसरीकडे नापिकी, शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यातच महावितरणने कृषी पंपाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठाही खंडित केला होता. खरिपाच्या नवीन हंगामासाठी मोठ्या उमेदीने शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे, परंतु बोपापूर, सुलतानपुरा मार्गावरील महाजन विद्युत डीपीची अवस्था पाहता पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसेल, काय, अशी धास्ती पडली आहे. या डीपीवर परिसरातील १० ते १२ शेतकऱ्यांची कृषी जोडणी आहे. येणाऱ्या वादळी पावसात ही डीपी कोसळल्यास शेतीचा विद्युत पुरवठा खंडित होण्यासोबत केव्हाही जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ‌े लक्ष देण्याची मागणी आहे.

नव्याने लवकरच उभी होणार विद्युत डीपी
सुलतानपूरा-बोपापूर मार्गावरील विद्युत डीपी शिकस्त झाली असून सिमेंट पोल तुटल्याने केव्हाही कोसळू शकते. नवीन डीपी उभारण्याकरिता आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून तत्काळ नव्याने विद्युत डीपी उभारण्याचे काम करण्यात येईल. -जयंत घाटे, विद्युत अभियंता, अचलपूर

कुणाच्याही जीविताला होऊ शकतो धोका
ही विद्युत डीपी शेतकऱ्यांच्या शेतात ये-जा करण्याच्या मार्गावर आहे. तिचा सिमेंट पोल तुटल्याने ती कधीही कोसळण्याच्या मार्गावर आली आहे. यामध्ये कुणाच्या जीविताला धोका होऊ शेकतो. प्रशासनाने कोणतीही घटना घडण्याची वाट न पाहता तत्काळ डीपी बदलवून द्यावी.-विपुल सोनी, शेतकरी

निवेदनाची अद्यापही घेतली नाही दखल
पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे ही डीपी कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आली आहे. मे महिन्यात डीपीच्या दुरूस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते, परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रशासन कुणाचा बळी जाण्याची तर वाट पहात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. -राजेंद्र अविनाशे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...