आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:दुचाकीचा धक्का लागला; चाकू अन् रॅफ्टरने केला एकाचा खून

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीने जात असताना ३८ वर्षीय अंटू नामक व्यक्तीचा परिसरातच राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला धक्का लागला. यातून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र, ही खदखद मारेकऱ्यांच्या मनात होती. त्यानंतर चार तासांनी गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री एकच्या सुमारास पाच जणांनी चाकू व रॅफ्टरने हल्ला चढवून अंटू नामक व्यक्तीचा खून केला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी (दि. ५) तिघांना अटक केली आहे. अंटू ऊर्फ सचिन किशोर म्हैसकर (३८), रा. दरोगा प्लॉट, अमरावती असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी रवि अशोक इंगोले (२७), रा. दरोगा प्लॉट, आकाश देविदास विघ्ने (२६), रा. सिद्धार्थ मैदान आणि यश संजय रायबोले (२१), रा. यशोदानगर १ असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

अंटू ऊर्फ सचिन हा ऑटो चालवायचा. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अंटू दुचाकीने गल्लीतून घरी जात असतानाच रवी इंगोले दुचाकीने येत होता. त्यावेळी दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून अंटू व रवी यांच्यात वाद झाला व किरकोळ मारहाणही झाली. त्यानंतर अंटूने त्याच्या पत्नीला फोन करुन सांगितले की, मला रवी इंगोले याने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली, त्यामुळे मी टेंशनमध्ये आहे, घरी उशिरा येईल. त्यानंतर रवी इंगोले याने आकाश विघ्ने, यश रायबोले व त्याच्या अन्य दोन मित्रांना फोन करुन बोलावले. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास रवी इंगोले व त्याच्या मित्रांनी अंटूला दरोगा प्लॉट परिसरात गाठले. चाकू व लाकडी रॅप्टरने त्याच्या मांडीवर व डोक्यावर प्रहार केले. यात अंटू रक्तबंबाळ झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी अंटूला परिसरातच सोडून पळ काढला. रात्री एकच्या सुमारास अंटूवर हल्ला झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता अंटू रक्ताच्या थारोळ्यात नालीजवळ पडून होता. दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मांडीवर पाच अन् डोक्यात एक मोठा घाव : मारेकऱ्यांनी अंटूवर हल्ला चढवला. त्याच्या मांडीवर चाकूचे पाच घाव केले. ३ घाव मोठे असून दोन लहान आहेत. तसेच डोक्यावर तीक्ष्ण हत्यार किंवा रॅप्टरचा मोठा घाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...