आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:मुलीला वाचवताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढला बाहेर

अमरावती7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुष्ठा येथील शेतातील शेततळ्यात खेळताना पाय घसरून अकरा वर्षांची मुलगी पडली. तिला वाचवण्यासाठी २५ वर्षीय युवकाने उडी मारली होती. मात्र दोघेही बाहेर येऊ शकले नव्हते. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान सोमवारी (दि. १४) सकाळी त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

हर्षाली विनोद वांगे (११, रा. कुष्ठा) आणि बाजीलाल कास्देकर (२५, रा. कुष्ठा) अशी मृतांची नावे असून दोघांचेही मृतदेह सोमवारी गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. गावालगतच हरिभाऊ नाथे यांचे शेत असून या शेतात मोठ्या आकाराचे शेततळे आहे. सुमारे पंधरा फुट खोल शेततळ्यात पाणी आहे. या शेततळ्याजवळ हर्षाली रविवारी दुपारी खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, खेळत असतानाच पाय घसरून हर्षाली शेततळ्यात पडली. यावेळी नाथे यांच्या शेतातच काम करणारा युवक बाजीलाल कास्देकर याने हर्षालीला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र बराच वेळ होऊनही हर्षाली व बाजीलाल बाहेर आले नाही.

ही माहिती गावकऱ्यांना मिळताच शेततळ्याजवळ गावकऱ्यांनी गर्दी झाली. पथ्रोट पोलिसही रविवारी पोहोचले होते. रविवारी रात्रीपर्यंत गावकरी व पोलिसांनी शेततळ्यात दोघांचाही शोध घेतला होता मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पाण्यात पोहणारे निष्णात जलतरणपटूंच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्यावेळी दोघांचेही मृतदेह हातात आले व ते बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...