आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून की आत्महत्या गूढ उकलेना:अमरावतीत 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला टाकीत

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय अभियंता तरुणीचा मृतदेह तिच्याच घराच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीमध्ये आढळला. ही घटना गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर परिसरातील रत्नप्रभा कॉलनीमध्ये शनिवारी (३ डिसेंबर) सकाळी उघड झाली आहे. तरुणीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचे पोलिसांनी या वेळी बोलताना सांगितले.अश्विनी गुणवंतराव खांडेकर हिने सिव्हिल इंजिनिअरिंग केले होते. २८ नोव्हेंबरपासून ती घरातून बेपत्ता होती. मैत्रिणीकडे जाते, असे तिने सांगितले होते. मात्र कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मैत्रिणीकडे नसल्याचे कळाले. दरम्यान ३० नोव्हेंबरला अश्विनीचा भाऊ आशिष यांनी गाडगेनगर पोलिस ठाणे ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती.

पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने लागला शोध शोध घेत असताना शनिवारी सकाळी कुटुंबीयांना पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे टेरेसवर असलेल्या वॉटर टॅँकमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना अश्विनीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. दरम्यान अश्विनीची आत्महत्या आहे की खून याबाबत अद्याप खुलासा झाला नाही. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत मिळाला नव्हता. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल.

बातम्या आणखी आहेत...