आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता:विहिरीत आढळला बेपत्ता मुलीचा मृतदेह

चिखलदरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोटमी या दुर्गम गावात स्वतःच्या शेतात एकोणवीस वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. कुमारी अंबिका गोंडू मरसकोल्हे (वय १९) असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होती. परंतु या संदर्भात तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार न देता नातेवाइकांकडे शोध सुरु ठेवला होता.

दरम्यान, उशीरा सायंकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. चिखलदरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीबाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात हवालदार विलास आवारे व शिपाई पवन सातपुते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...