आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार उद्या, शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळनंतर कुणालाही जाहीर सभा घेता येणार नाही. त्याचवेळी सार्वजनिक ठिकाणी चौक सभा घेऊन फेरीही काढता येणार नाही.
आगामी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी ८३५ मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली असून संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त पोलिस कुमकही तैनात ठेवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील नोकरदारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केले आहेत. सर्व मतदान केंद्रांसाठी आवश्यक तेवढे इव्हीएम तालुक्याच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
पाच गावांचे सरपंच, सदस्य यांची निवड बिनविरोध जिल्ह्यातील २५७ ग्राम पंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर चिखली वैद्य, वरुडा तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापुर तालुक्यातील सांगवा बुजुर्ग या पाच गावांतील सरपंच व सदस्य बिनविरोध विजयी झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.