आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस तपास यंत्रणेवर‎ उच्च न्यायालयाची नाराजी‎:प्रभात चौकातील शिकस्त इमारत कोसळल्याचे प्रकरण‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभात चौकातील शिकस्त इमारतीमधील‎ तळमजल्यावर असलेल्या राजदीप‎ एम्पोरियमची दुरुस्ती सुरू असताना संपूर्ण‎ दुकानाचा गाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेत‎ पाच जणांचा मृत्यू झाला.‎ ३० आॅक्टोबरला झालेल्या या अपघातात‎ पोलिसांनी दुकान मालक, ठेकेदार असे एकूण‎ पाच जण व मनपा झोन क्र. २ चे दोन अभियंता‎ अशा एकूण सात जणांना दोषी ठरवून‎ त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. नुकताच‎ हायकोर्टाने मनपाच्या दोन्ही अभियंत्यांना‎ अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर या प्रकरणी‎ झालेल्या सुनावणीत पोलिस तपास यंत्रणेवर‎ एकूणच नाराजी व्यक्त केली आहे.‎

पोलिस तपासात हायकोर्टाला ज्या उणिवा‎ आढळल्या त्यानुसार शिकस्त इमारतीचे‎ स्ट्रक्चरल ऑडिट करणारी एजन्सी तसेच‎ आर्किटेक्चर अभियंत्यांविरोधात गुन्हा का‎ दाखल केला नाही. त्यांचा आरोपींमध्ये‎ समावेश का नाही, असा प्रश्न हायकोर्टाने‎ विचारला आहे.‎ इमारत कोसळल्यामुळे पाचही जणांचा‎ दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी जबाबदार‎ असलेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल‎ करून त्यांना अटक करण्यासाठी योग्य‎ दिशेने तपास केला जाईल, अशी अपेक्षाही‎ न्यायालयाने व्यक्त केली आहे.‎ या प्रकरणाचा तपास करणारे मनपाचे दोन‎ अभियंता आरोपी ठरतात, त्यावेळी‎ स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्यांचा आरोपींमध्ये‎ समावेश का करण्यात आला नाही, अशी‎ विचारणा हायकोर्टाने केल्यानंतर तपास‎ अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता‎ आले नाहीे. त्यामुळे न्यायालयाने नाराजी‎ व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...