आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडांचा हल्ला:माकडांच्या उच्छांदात नागरिकाला घेतला चावा; नागरिक त्रस्त

वाशीम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जवाहर नवोदय विद्यालयासमोर असलेल्या शिवाजीनगर परिसरात माकडांनी शनिवारपासून उच्छाद मांडला असून, तेथील एका नागरिकाला माकडाने चावा घेतल्याची घटना घडली. सदानंद नारायण बनसोड असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवाजीनगरमध्ये दररोज माकडांची टोळी धुमाकूळ घालत असते. अशातच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास काही माकडांची टोळी परिसरात आली. दरम्यान परिसरात राहणारे सदानंद बनसोड यांच्याकडे माकडांनी धाव घेत त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्याजवळ त्यांची दिड वर्षाची मुलगी सुध्दा होती. त्यांनी मुलीला माकडापासून वाचवले. परंतु, माकडाने चावा घेतल्याने मोठी जखम असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माकडांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...