आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षार्थी हजर:शहरात 23 केंद्रांवर दोन सत्रामध्ये पार पडली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी राज्य सेवा पूर्व परीक्षा विविध पदांसाठी घेण्यात आली. शहरातील २३ केंद्रांवर दोन सत्रात पार पडलेल्या परीक्षेकरिता पहिल्या पेपरसाठी ५ हजार १९९ उमेदवार हजर तर १ हजार ५५९ गैरहजर होते. तसेच द्वितीय सत्रातील पेपर दोन साठी ५ हजार १६९ विद्यार्थी हजर होते तर १ हजार १६९ विद्यार्थी हे विविध कारणांनी गैरहजर . परीक्षेला जिल्ह्यातील ६ हजार ७५८ उमेदवार परीक्षेस पात्र ठरले होते. यासाठी परीक्षा केंद्रांवर ७०० अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहीर तारखेवर परीक्षा शांततेत पार पडली. या अंतर्गत एकुण १६१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगर परिषद मुख्याधिकारी गट ‘अ’, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ‘ब’ या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या पूर्व परीक्षेत गट ‘अ’ मध्ये ५९ आणि गट ‘ब’मध्ये १४ पदांसाठी तसेच इतर ८८ पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी शहरातील २३ केंद्रांवर सकाळी १० ते १२ आणि ३ ते ५ या दोन सत्रात दोन पेपर घेण्यात आले. पहिल्या पेपरला ५ हजार १९९ हजर तर १ हजार ५५९ विद्यार्थी हे गैरहजर होते.

तसेच पेपर दोन साठी ५ हजार १६९ उमेदवारांनी परीक्षा दिली तर १ हजार ५८९ उमेदवार विविध कारणांनी गैरहजर होते. पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातर्फे बस उपलब्ध असल्याने परीक्षार्थ्यांची सोय झाली.

बातम्या आणखी आहेत...