आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलावरील ‘एक्स्पान्शन जॉइंट’ची दुरुस्ती‎:बंद असलेला राजापेठ ते इर्विन उड्डाणपूल‎ आठवडाभरात वाहतुकीसाठी होणार खुला‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजापेठ ते इर्विन उड्डाणपुलावरील श्याम चौकाच्या‎ वळणावरील ‘एक्स्पान्शन जॉइंट’मधील रबरसारखे‎ मटेरियल निघून खाली पडले होते. त्यामुळे खळबळ‎ उडाली होती. दरम्यान उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर मजबूत‎ असल्यामुळे पूल वाहतुकीसाठी योग्यच आहे. त्यामुळे‎ ‘एक्स्पान्शन जॉइंट’मध्ये रबरसारखा घटक टाकण्याचे काम‎ आता साबांविची यंत्रणा स्वत:च करणार आहे. त्यामुळे‎ आगामी आठवडाभरात पूल वाहतुकीसाठी खुला होणार‎ असल्याची माहिती साबांविच्या सूत्रांनी दिली आहे.‎ इर्विन ते राजापेठ या तेराशे मीटरच्या उड्डाणपुलावरील‎ ‘एक्स्पान्शन जॉइंट’मधील रबरसारखे असणारे मटेरियल‎ खाली पडून त्यामध्ये चार इंचाची गॅप तयार झाली होती.‎

चार ते पाच दिवसांत‎ होईल काम‎ आम्ही आमच्या तज्ज्ञांच्या‎ मदतीने ‘एक्स्पांशन जॉइंट’मध्ये‎ मटेरियल भरण्याचे काम सुरू‎ करणार आहोत. हे काम‎ तात्पुरत्या स्वरूपाचे असून‎ काम सुरू झाल्यानंतर चार ते‎ पाच दिवसांत ते पूर्ण होईल,‎ त्यानंतर पूल वाहतुकीसाठी‎ खुला करण्यात येईल.‎ -चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी‎ अभियंता, साबांवि.‎