आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:ईडी’चा प्रतीकात्मक पुतळा जाळूनकाँग्रेसने केला केंद्र शासनाचा निषेध ; केंद्राविरोधात घोषणा

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना सुद्धा नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ‘ईडी्नेर चौकशीची नोटीस बजावून चौकशी साठी बोलविण्यात आले. या ‘ईडी’च्या नोटीसाविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे. याचे पडसाद अमरावतीत दिसून आले. बुधवारी सायंकाळी शहरातील बियाणी चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने ईडी कार्यालयाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. सोबतच संतप्त कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र शासनाच्या दडपशाही विरोधात तीव्र नारेबाजीही केली. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, केंद्रातील भाजप सरकार आता घाबरले असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत ( ईडी) हल्ला केला आहे. मात्र, या हल्ल्याला काँग्रेस पक्ष घाबरत नाही. ईडी ची नोटीस प्राप्त होताच सोनिया गांधी आणि राहुल गांधी १३ आणि १४ जून रोजी ईडी कार्यालयात हजर झाले. मात्र, बुधवारी (दि.१५) पुन्हा बोलवण्यात आले आहे. सलग तीन दिवसांपासून चौकशी करता बोलवण्यात येत आहे. केंद्राचे हे कटकारस्थान असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. केंद्राच्या या दडपशाही विरोधात काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस, एनएसयुआय, एकवटले. बुधवारी बियाणी चौकात ईडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोबतच रस्त्याच्या मधोमध टायर जाळून निषेध केला. यावेळी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, अनिकेत ढेंगळे, शक्ती राठोड, अंकुश डहाके, संकेत कुलट, योगेश बुंदेले, अक्षय साबळे, विनोद सुरोसे, नीरज कोकाटे, सर्वेश खांडे, नितीन काळे, सर्वेश कन्हेरकर, आशिष यादव, शुभम भुयार, विकी तायडे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...