आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या कंत्राटदाराशी करार संपुष्टात आणून नवीन कंत्राटदार साहू टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स यांना शहर बसचे कंत्राट देण्यात आले. परंतु, नगर सचिव कार्यालयाने नव्या कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास अद्याप ठरावच मंजूर केला नाही. त्यामुळे एक महिना उलटला तरी शहर बस सेवा अद्याप सुरू झाली नाही. परिणामी शहरवासीयांमध्ये राेष व्यक्त हाेत आहे. नव्या कंत्राटदाराकडे जबाबदारी सोपवल्यानंतरही शहर बस सेवा सुरू झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जास्त पैसे खर्च करून पर्यायी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
अनेकांना बडनेरा येथे जाण्यासाठी या शहर बसेस फारच सुविधाजनक होत्या. परंतु, शहर बस सुरू होईपर्यंत लोकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पृथ्वी टूर्सच्या संचालकांनी बँकेकडून ५ कोटीचे कर्ज घेतले होते. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे शहर बस सेवा बंद राहिली. त्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते थकले. कोरोनानंतर शहरात २५ शहर बसेस धावत होत्या. यासाठी प्रति किमी. ५.३२ रुपये रॉयल्टी दरमहा कंत्राटदाराला मनपाकडे भरणे आवश्यक होते. परंतु, रॉयल्टी थकीत ठेवण्यासोबतच बँकेचे २.४२ कोटीचे कर्ज भरले नसल्यामुळे मनपा आयुक्तांनी हा करार एक महिन्याआधी रद्द केला.
मंजुरी मिळताच पुढील कारवाईशहर बस सुरू करण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप नगर सचिवांनी करारनाम्याच्या ठरावाला मंजुरी दिली नसल्याने काम रखडले आहे. मंजुरी मिळाली की तत्काळ पुढील कारवाई होणार. - लक्ष्मण पावडे, सहायक अभियंता, कार्यशाळा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.