आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकूण 3 लाख 10 हजारांचा‎ ऐवज केला जप्त‎:गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या‎ चोरट्याकडून केल्या पाच दुचाकी जप्त‎

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हे शाखेच्या पथकाने एका ‎ ‎ दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. ‎ ‎ त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी जप्त‎ केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी‎ रविवारी (दि. १२) केली आहे. शुभम नंदू ‎ ‎ दांडेकर (२२, रा. वडाळी) असे पोलिसांनी ‎ ‎ अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. ‎ ‎ टाकरखेडा संभू येथे राहणाऱ्या राजू‎ गुलाबराव औंधकर यांची दुचाकी चोरीला‎ गेली होती. त्या प्रकरणी त्यांनी १७ फेब्रुवारी‎ २०२३ रोजी गाडगेनगर पोलिसांत तक्रार‎ दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी‎ अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान,‎ या प्रकरणात गुन्हे शाखेचे पीएसआय नरेश‎ कुमार मुंडे व त्यांच्या पथकाने शुभम‎ दांडेकरला संशयाच्या आधारे ताब्यात घेऊन‎ त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून‎ औंधकर यांच्या दुचाकीसह आणखी पाच‎ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जप्त‎ केलल्या दुचाकींची किंमत ३ लाख १० हजार‎ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही‎ कारवाई गुन्हे शाखेचे पीआय अर्जुन ठोसरे‎ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मुंडे व त्यांच्या‎ पथकाने केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...