आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्वाल्हेर आणि दिल्लीत जेतेपदासाठी निर्णायक झुंज ; आज अंतिम लढत

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मेजर ध्यानचंद चषक महिला हॉकी स्पर्धेत सोमवार २० रोजी ग्वाल्हेर अकादमी अन् बीएसपी दिल्ली यांच्यात जेतेपदासाठी अंतिम लढत रंगणार आहे.

जेसीआय अमरावती गोल्डन व अमरावती जिल्हा महिला वुमेन्स हाॅकी अकादमी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली ही स्पर्धा शहरातील तीन क्रीडांगणावर खेळविण्यात आली. त्यात एचव्हीपीएम, पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि डिप्टी ग्राऊंडचा समावेश आहे. अंतिम सामना पं.जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात एमपी अकादमी ग्वाल्हेरने अप्रतिम सांघिक खेळ व अचूक पासेससह पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये परिवर्तन करण्यात यश मिळविल्यामुळे पुण्यावर ७-२ गोलने दणदणीत मात करून अंतिम फेरीत धडक दिली. ग्वाल्हेर संघाचा वेग तसेच अनुभवही या सामन्यात कामी आला. अप्रतिम ड्रीबलिंग हे या सामन्यातील खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

दुसरी उपांत्य लढत एकतर्फी ठरली. बीएसपी दिल्लीने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करून यजमान अमरावती संघाला ५-० गोलने नमविले. अमरावती संघाला काही संधी मिळाल्या परंतु, बीएसपी दिल्लीच्या बचाव फळीणे आक्रमण उधळून लावले.

बातम्या आणखी आहेत...