आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील अनेक वर्षांपासून अमरावतीत सीएनजीची प्रतीक्षा होती. मात्र आता जिल्ह्यात सीएनजी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार पंपावर ‘सीएनजी’ लवकरच मिळणार आहे. यातही नांदगाव पेठजवळ असलेल्या कोल्हटकर पंपावर झपाट्याने काम पूर्णत्वास येत असून, याठिकाणी सहा महिने किंवा तत्पूर्वीच सीएनजी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ‘सीएनजी किट’ असलेल्या किंवा नव्याने बसवणाऱ्या कार, ऑटो व इतरही वाहनांना याचा मोठा फायदा होणार आहे. याचवेळी उर्वरित तीन पंप वरसुद्धा ‘सीएनजी’साठी आवश्यक कामांचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. अलीकडे सातत्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढतच आहेत.
‘सीएनजी’चा पुरवठा अदानी कंपनी करणार जिल्ह्यात चार पंपावर सीएनजी मिळणार आहे. त्यापैकी नांदगाव पेठ येथील कोल्हटकर पंपावर सर्वप्रथम सीएनजी उपलब्ध होईल. आम्ही या ठिकाणी ३१ मार्च २०२३ पर्यंत आमचे काम पूर्ण करणार आहोत. त्यानंतर गॅस कधी वितरित करायचा याबाबत निर्णय अदानी कंपनी घेईल. गॅस कुठून आणणार हे तूर्तास आम्हालाही माहिती नाही. मात्र, अदानी कंपनी ‘सीएनजी’चा पुरवठा करणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली.
आमच्याकडे कामाला झाली सुरूवात
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चार पेट्रोल पंपावर सीएनजी आगामी सहा महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यापैकी आमच्या पंपावर काम सुरू झाले आहे. हे दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे.विपिन कट्यारमल, संचालक, कोल्हटकर ट्रॅव्ह.सर्व्हिसेस.
पहिल्या टप्प्यात शहराबाहेर उपलब्ध
पहिल्या टप्प्यात चार पंपावर सीएनजी मिळणार आहे. हे चारही पंप शहरांबाहेरील आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात शहरातील काही पंपावर सीएनजी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कंपनीकडून सर्वेचे काम झाले आहेत.-सौरभ जगताप,सचिव, पेट्रोल डिझेल असोसिएशन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.