आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला मारली:रात्री 11 वाजता डिजे सुरू होता, बंद करा म्हटल्याने पोलिसाला मारली बुक्की ; गुन्हा दाखल

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेंद्र कॉलनी भागातील घटना;

महेंद्र कॉलनीतील राम मंदिराच्या मागील बाजूला रात्री ११ वाजले तरीही मोठ्या आवाजात डिजे सुरू होता. हा डिजे बंद करण्याबाबत गस्तीवरील पोलिसांनी लग्न समारंभातील व्यक्तींना सांगितले. त्यावेळी याच ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांसोबत हुज्जत घातली तसेच एका पोलिसाला बुक्की मारली. हा प्रकार शनिवारी उशिरा रात्री घडला असून, या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. नानक गुंडनमन साधवानी (४१, रा. महादेवखोरी अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नानक साधवानीने कर्तव्यावरील पोलिस चालक अयुब पठाण यांना बुक्की मारली. पठाण व एएसआय सुरेश डबरे हे शनिवारी रात्री ‘डायल ११२’ वाहनावर गाडगेनगर हद्दीत रात्र गस्तीवर होते. दरम्यान महेंद्र कॉलनीतील राम मंदिराच्या मागील बाजूला रात्री सव्वा अकरा वाजले तरीही मोठ्या आवाजात डिजे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एएसआय डबरे व अयुब पठाण हे डिजे सुरू होता त्या ठिकाणी पोहाेचले. त्यावेळी पोलिसांनी लग्न समारंभातील व्यक्तींना डिजे बंद करण्याबाबत विनंती केली. याच दरम्यान लग्नसमारंभात असलेल्या नानक साधवानीने या दोन्ही पोलिसांसोबत वाद घालून थेट अयुब पठाण यांच्या अंगावर येऊन लोटलोट केली. तसेच त्यांच्या डोक्यावर पंच (बुक्की) मारला. त्यानंतर तुम्ही मला ओळखत नाही का, या ठिकाणचा डिजे बंद होणार नाही, जे करायचे ते करून घ्या, अशी धमकी दिली. या प्रकरणी एएसआय डबरे यांनी तत्काळ गाडगेनगर ठाण्यात ही माहिती दिली. तसेच त्यांनी नानक साधवानीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, या कलमान्वये साधवानीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...