आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचालक पोलिसांच्या स्वाधीन:कारचालक भरधाव वेगात आला अन् बंद असलेले रेल्वे फाटकच तोडले

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग वर सोमवारी (दि. ५) उशिरा रात्री एका कार चालकाने रेल्वे येणार असल्यामुळे बंद असलेले रेल्वे फाटकाला धडक दिली. या धडकेत रेल्वे फाटक तुटले आहे. याप्रकरणी राजा पेठ पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

केतन शरदराव बनसोड (३०, रा. गणेश विहार कॉलनी, अमरावती) असे त्या कारचालकाचे नाव आहे. अमरावती ते बडनेरा रेल्वे मार्गावर गोपाल नगर येथे रेल्वे क्रॉसिंग आहे. याच रेल्वे क्रॉसिंगवर व्यावसायिक केतन बनसोड यांनी आय ट्वेन्टी कार घेऊन जात असताना धडक दिली. दररोज रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास अमरावती वरून बडनेराच्या दिशेने रेल्वे जाते. हीच रेल्वे येणार असल्यामुळे सोमवारी रात्री रेल्वे वाहतूक नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद केले होते. यावेळी फाटक बंद होत असतानाच केतन बनसोडने भरधाव कार आणली. त्याचवेळी रेल्वे फाटक बंद होत होते. त्यावेळी कार फाटकावर आदळली आणि यामध्ये रेल्वे फाटक तुटले आहे.

ही माहिती राजा पेठ पोलिसांना मिळतात राजा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी केतन बनसोडसह कार ताब्यात घेतली. ही माहिती रेल्वे पोलिसांनाही देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ राजा पेठ पोलिसांकडून केतन बनसोड व ज्या कारने अपघात घडला. ती कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई बडनेरा रेल्वे पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...