आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवतेचे दर्शन घडवणारा प्रकार:फिर्याद देणाऱ्या वृद्धाचे हाड होते तुटलेले; पोलिसांनी तातडीने आधी उपचार करवला

शेंदूरजनाघाट23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारहाणीची फिर्याद घेऊन पोलिस स्टेशनला आलेले साठ वर्षीय गृहस्थ राम साने यांची तक्रार नोंदवून घेताना पोलिसांच्या असे लक्षात आले की या गृहस्थाच्या हातामध्ये प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे ते रिपोर्ट नीट लिहून देऊ शकत नाही. किंवा तोंडी सांगूही शकत नाहीत.

त्यांच्या या वेदना खाकी वर्दीतील पोलिसांनी जाणून घेतल्या आणि त्यांच्या ‘खाकी’तील माणूस जागा झाला. पुढे त्या माणसाची संवेदनशीलता जागी झाली आणि मग त्या व्यक्तीला दिलासा देण्याकरिता पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलकडे जाण्याचा सल्ला दिला. परंतु खिशात दमडी नसताना हॉस्पिटलचा खर्च कसा करणार ? या विवंचनेमुळे ते गृहस्थ दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करीत होते. ठाण्यात उपस्थित पोलिस सचिन भाकरे व मिलिंद वाटाणे ही बाब ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी लगेच फिर्याद देण्यासाठी पोहोचलेल्या त्या व्यक्तीला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. शिवाय उपचाराचा खर्च आपण पोलीस वर्गणीतून करू, असे आश्वासनही दिले.

ठाणेदार चौगावकर यांनी आपल्या वाहनात बसवून त्या व्यक्तीला मातोश्री हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. तेथील डॉक्टर महेंद्र राऊत यांना जेव्हा वास्तविकता कळली, तेव्हा त्यांनीही मानवतेचे दर्शन देत मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली आणि त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. एक्सरेनंतर सदर व्यक्तीच्या हाताचे हाड अक्षरश: मोडल्याचे लक्षात आले. त्यामुळे लगेच ऑपरेशनची तयारी करुन पुढील औषधोपचार सुरु करण्यात आला. विशेष असे की डॉक्टरांनी त्यासाठी एकही रुपया घेतला नाही. त्यांनी संपूर्ण उपचार मोफत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी त्यांचे मनोमन आभार मानले. दरम्यान, दयामाया नाही, असे चित्र डोळ्यासमोर आणले जाते. परंतु या खाकी वर्दीच्या आतही एक माणसाचे संवेदनशील हृदय आहे, याचा परिचय आज वरुडवासीयांना आला.

बातम्या आणखी आहेत...