आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनची जोड:विधान परिषदेच्या मतदारयादीला मिळाली अखेर सर्च इंजिनची जोड

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय मतदारसंघाच्या यादीत नाव व अनुक्रमांक शोधण्यासाठी आता पूर्वीसारखे हजारो नावांमध्ये स्वत:चे नाव शोधण्याचा द्रविडी प्राणायाम करावा लागणार नाही. सर्च इंजिन नसलेल्या या यादीला आजपासून इंजिनची जोड मिळाल्याने मतदाराला आपले नाव शोधणे एका क्लिकवर शक्य झाले आहे.

‘सर्च इंजिनच नाही, त्यामुळे नाव तरी कसे शोधणार ?’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने गुरुवारच्या अंकात याबद्दलचे वास्तव स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या वेगवान घडामोडी अंती मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी सर्च इंजिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्च इंजिन हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या कार्यालयाशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यामध्ये मतदारसंघ (शिक्षक किंवा पदवीधर), जिल्हा, आडनाव आणि उर्वरित. पान ३

कागदी यादी अल्फाबेटनुसार हवी ऑनलाइन पर्याय उपलब्ध नसलेल्या ठिकाणी कागदावरील यादीत नाव शोधावे लागते. मात्र यै यादीला आद्याक्षराचा (अल्फाबेट) निकष लावण्यात आला नाही. एरवी इंग्रजी वा मराठी आद्याक्षरानुसार नाव शोधले जाते, परंतु कागदावर उपलब्ध असलेली समग्र यादी हाती लागल्यास हे सूत्र वापरणे शक्य नाही. त्यामुळे त्या यादीत नाव नेमके शोधायचे कसे, असा प्रश्न गाव-खेड्यात राहणाऱ्या मतदारांमार्फत विचारला जात आहे. कदाचित आगामी ३० डिसेंबरला अंतिमत: प्रकाशित होणाऱ्या यादीत हा निकष पाळला जाईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...