आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांनाही संधी:अकरावीच्या विशेष फेरीला आजपासून होणार सुरुवात ; 6 हजार 404 रिक्त जागा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता अकरावीच्या चार फेऱ्या आटोपल्या नंतरही शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांच्या ६ हजार ४०४ जागा रिक्त आहेत. त्यासाठी आजपासून प्रवेशाची विशेष फेरी सुरू होत आहे. यामध्ये एटीकेटी अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

केंद्रीय प्रवेश समिती समन्वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कला शाखेच्या सर्वाधिक १ हजार ६२३, एमसीव्हीसीच्या २ हजार ५७, वाणिज्य शाखेच्या १ हजार २५८ आणि विज्ञान शाखेच्या १ हजार ४६६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अद्याप ज्यांचा प्रवेश निश्चित झाला नाही अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरुन घ्यावा. या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना पसंती क्रम नोंदवावा लागतो. संबंधितांनी तो काळजीपूर्वक नोंदवून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्रा. मंगळे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म क्रमांक दोन भरून दिला होता. त्यांना नव्याने हा फॉर्म भरून द्यावा लागेल. तत्पूर्वी ३० ऑगस्ट रोजी चौथी फेरी लागणार होती. मात्र, गणेश चतुर्थी आणि गौरी पूजनामध्ये ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले. आजवर ९ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश झाले आहेत. सोमवारपासून (१२ सप्टेंबर) विशेष फेरीला सुरुवात होणार आहे. अजूनही ६ हजार ४०४ जागा रिक्त आहेत. यामध्ये एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे, असे शिक्षण विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...