आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवार, ५ डिसेंबरला शहरातील फुटपाथ प्रथमच मोकळे करण्यासाठी कारवाई केली. याअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते, पंचवटी चौक, गाडगेनगर ते आरटीओ कार्यालय, डीमार्ट, विधी महाविद्यालय परिसर, बियाणी चौक रोड, शेगाव नाका ते नवसारी रोड या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभाग व झोन क्र. १चे पथक आणि पोलिसांच्या सहकार्याने सकाळी ११ वाजता कारवाई केली.
फूटपाथवरील हातगाड्या, नाल्यांवर विना परवानगी ठेवणलेले खोके, दुकानांचे विना परवानगी टाकलेले शेड, कापडी पाल, वजन काटे जप्त केले. हातगाड्यांमुळे फुटपाथवरून चालण्यास जागाच उरत नाही. त्यामुळे ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. शहरातील फेरीवाले, हाॅकर्स यांनी विना परवानगी रस्ते, फूटपाथवर हातगाड्या लावू नयेत. अन्यथा त्यांच्याविरोधात जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपाने दिला. या वेळी अतिक्रमण पथक प्रमुख अजय बंसेले, उत्तर झोन क्र. १ चे सहायक क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव, अनिकेत मिश्रा व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.