आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची कारवाई:फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून शहरातील रस्ते केले मोकळे, विनापरवाना दुकानांवरही कारवाई

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर असे तात्पुरते अतिक्रमण झाले होते. मनपाने प्रयत्नपूर्वक ते हटविले. - Divya Marathi
शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर असे तात्पुरते अतिक्रमण झाले होते. मनपाने प्रयत्नपूर्वक ते हटविले.

शहरातील रस्‍त्‍यांवर अस्‍थायी स्‍वरुपाचे अतिक्रमण असल्‍यामुळे रस्त्यांचा श्वास कोंडला आहे. हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील विविध रस्त्यांवरील तात्पुरते अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु केली. ही कारवाई शनिवारी उशीरा सायंकाळपर्यंतही सुरुच होती.

एक दिवसांपूर्वी शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत रूक्मिणी नगर, बस स्टॅन्ड, चौधरी चौक, चित्रा चौक, इतवारा चौक, टांगापडाव चौक, गांधी चौक, राजापेठ, नवाथे चौक येथील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा त्याच रोडवर अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्‍यात आली. कारवाई दरम्यान रस्त्याच्या दोन्‍ही बाजुंनी असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या हटविण्यात आल्या तर वारंवार अतिक्रमण करीत असल्यामुळे काहींवर जप्तीची कुऱ्हाड उचलली गेली. त्यानुसार १५ हातगाडी, १५ बॅटरी, १२ कॅरेट, दोन मोठ्या छत्र्या, पाच कटर बॉक्स, पाच पाईप बंडल, चार ताडपत्र्यांचे बंडल जप्त करण्यात आले. अशाप्रकारे रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करण्‍यात आले.

अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्‍त डॉ. प्रवीण आष्‍टीकर यांनी घेतला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. असा अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख अजय बन्‍सेले, निरीक्षक श्याम चावरे, योगेश कोल्हे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी राज कुशवाह, आशिष गुळसुंदरे, अनीस खान, शकील बेग, यश सांगोले, अजय ढोके, शेख सलीम, सुरज गुळसुंदरे, निलेश चवळे, अजय पेठे यांच्यासह काही पोलीस कर्मचारीही कारवाईदरम्यान तैनात करण्यात आले होते.

विनापरवाना दुकानांवर कारवाई

दरम्यान मुख्य मार्गावर, नालीवर व फूटपाथवर हातगाड्या, खोके, भाजीपाला दुकाने विनापरवानगी लावण्यात येऊ नये. अन्यथा अतिक्रमण विभागातर्फे कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...