आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र कौतुक:तेरवीचा संपूर्ण खर्च देवस्थानाला समर्पित ; धोत्रा येथील काकडे परिवाराचा निर्णय

कुऱ्हा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची तेरवी न करता त्यासाठी येणाऱ्या खर्चाची संपूर्ण रक्कम देवस्थानाला देण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणीही केली. या विधायक कार्यासाठी परिसरातील माणिकग्राम धोत्रा येथील काकडे परिवाराने पुढाकार घेतला असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंजाबराव नीळकंठराव काकडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. दुःख सहन करत असताना या परिवाराने मानवतेचा परिचय करून देणारे, समाजहीत जाेपासणारे आदर्शवत पाऊल उचलून समाजाप्रती आपली सकारात्मकतेची जाणीव करून दिली. पंजाबराव काकडे यांचे सुपूत्र अतुल पंजाबराव काकडे यांनी आपल्या वडिलांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला होऊ घातलेल्या खर्चाऐवजी तो खर्च चांगल्या कामासाठी खर्च व्हावा आणि त्याचा उपयोग समाज ऋण फेडण्याचा हेतूने आपण उत्तराई व्हावे म्हणून तेरवीसाठी लागणारा संपूर्ण खर्च श्री विठ्ठल रुख्माई संस्थान माणिकग्राम धोत्रा येथील मंदिराच्या कामासाठी देण्याचा संकल्प जाहीर केला.

५१ हजार रुपयांचा संकल्प करून
समाजापुढे आदर्श निर्माण केला. धार्मिक वृत्ती सोबतच समाज ऋण, देव ऋण आणि मातृपितृ ऋण फेडण्याचा निर्णय घेत काकडे कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला. संस्थेचे अध्यक्ष दीपक उतखेडे आणि विश्वस्तांनी यासाठी काकडे परिवाराचे कौतुक केले असून, सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...