आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​उपमुख्यमंत्र्यांचे सूतोवाच:‘व्हीएमव्ही’च्या रुपाने अमरावती येथे‎ स्थापन होणारे असेल चौथे विद्यापीठ‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंभर वर्षांचे वय हे एखाद्या व्यक्तीसाठी‎ इतिश्री असते पण हेच वय एखाद्या‎ संस्थेचे असेल तर तो त्या संस्थेच्या‎ प्रगल्भतेचा काळ असतो, असे म्हणत‎ शताब्दी वर्षात पोचलेल्या विदर्भ ज्ञान‎ विज्ञान संस्थेने आता विद्यापीठाकडे‎ वाटचाल करावी, असे आवाहन‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.‎ त्यासाठी जे-जे लागेल ते करु, अशी‎ ग्वाहीही जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या‎ फडणवीस यांनी दिली आहे.‎ विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी‎ महोत्सवाचा शुभारंभ आज, सोमवारी‎ दुपारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात‎ आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार‎ डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास‎ तडस, खासदार नवनीत राणा, आमदार‎ प्रवीण पोटे-पाटील, सुलभाताई खोडके व‎ अशोक उईके, विभागीय आयुक्त डॉ.‎ निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी‎ अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी‎ रिचर्ड यान्थन, प्रभारी शिक्षण संचालक‎ डॉ. शैलेंद्र देवळाणकर, व्हीएमव्हीच्या‎ संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी‎ मान्यवर यावेळी उपस्थित होते.‎ पालकमंत्री फडणवीस म्हणाले की,‎ संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.‎ संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान‎ आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे‎ अनेक महापुरुष याच महाविद्यालयात‎ घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी‎ अनेक मोठी व्यक्तिमत्व येथे घडली.‎ संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व‎ सुविधा उपलब्ध आहेत. त्यात भर‎ घालण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपये‎ दिले आहेत.

परंतु त्यावर समाधान मानू‎ नका. एकल विद्यापीठासाठीही शासन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सर्वतोपरी सहकार्य करेल. संस्थेने‎ ''आयकॉनिक संस्था'' म्हणून विकास‎ करावा. या संस्थेला जेव्हा १२५ वर्षे पूर्ण‎ होतील, तेव्हा संस्थेचा गौरव केवळ‎ विदर्भात नव्हे तर राज्यभर व्हावा, या‎ दृष्टीने प्रयत्न व्हावा, असेही ते म्हणाले.‎ येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मंडळालाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा‎ जाहीर करण्यात आला आहे. रिद्धपुर येथे‎ मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार‎ आहे. शिवाय अमरावती येथे लवकरच‎ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू‎ करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात‎ ‘शैक्षणिक हब’ म्हणून जिल्ह्याचा विकास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र‎ सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण‎ लवचिक आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना‎ त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल.‎ भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी‎ शिक्षण घेता येणार आहे, हेही फडणवीस‎ यांनी स्पष्ट केलेय‎ प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका डॉ.‎ अंजली देशमुख यांनी केले. संस्थेच्या‎ निर्मितीपासून ते आजवर झालेल्या‎ प्रगतीची माहिती त्यांनी दिली.‎ स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात‎ महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या संस्थेची‎ सुरवात लोकवर्गणीतून झाली. संस्थेत‎ आज २२ पदव्युत्तर विभाग असून ३१६‎ विद्यार्थी संशोधन करीत असल्याचे‎ त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ८५‎ विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या संस्थेचा‎ डोलारा आज ४ हजार ७५७‎ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी‎ सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.‎ मंजुषा वाठ यांनी केले. तर आभार प्रा.‎ डॉ. साधना कोल्हेकर यांनी मानले.‎