आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान मालकाविरुद्ध गुन्हा‎ दाखल:श्वानमालकाला तरुणीने विचारले, हा चावत‎ तर नाही ना! ; श्वानाने घेतला तरुणीला चावा‎

अमरावती‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाड्याने खोली पाहिजे असल्यामुळे‎ एक तरुणी एका घरात खोली पहायला‎ गेली. त्या घरात श्वान होता, तरुणीने‎ श्वानमालकाला विचारले हा चावत‎ नाही ना, त्यावर श्वान मालकाने नाही‎ म्हटले. त्यानंतर तरुणी खोली पाहून‎ घरातून बाहेर पडत असताना त्या‎ श्वसनाने तरुणीच्या पायाला चावा‎ घेतला. या प्रकरणी तरुणीच्या‎ तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी‎ श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला आहे.‎ गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील‎ गोविंदनगरमध्ये विक्रम लादणे यांचे घर‎ आहे. त्याच्याच घरी भाड्याने खोली‎ पाहण्यासाठी एक तरुणी शनिवारी (दि.‎ ११) गेली होती.

ती लादणे यांच्या घरात‎ गेली, त्यावेळी त्या ठिकाणी श्वान होता‎ व तो बांधलेला नव्हता. त्यामुळे‎ तरुणीने लादणे यांना विचारले की, हा‎ श्वान चावत तर नाही ना, त्यावर‎ लादणे यांनी नाही, तो चावत नाही,‎ असे म्हटले, त्यामुळे तरुणी त्या घरात‎ गेली. तीने खोली पाहिली आणि‎ घरातून बाहेर पडत असतानाच‎ अचानक तो श्वान तरुणीच्या मागे‎ धावला आणि त्याने तरुणीच्या पायाला‎ चावा घेतला. त्यामुळे तरुणीने‎ गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले आणि‎ श्वानमालकाविरुध्द तक्रार दिली.‎ तक्रारीवरून पोलिसांनी विक्रम लादणे‎ यांच्याविरुध्द हयगयीने श्वान‎ बाळगल्याच्या कलमान्वये गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...