आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील वर्तन:तरुणीने अश्लील वर्तन  करणाऱ्या तरुणाच्या  कानशिलात लगावल्या

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या बहिणीकडे पाहुणी म्हणून गेलेल्या एका तरुणीसोबत तरुणाने घरात जाऊन अश्लील वर्तन केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणीने त्या तरुणाच्या कानशिलात लगावल्या. त्याला प्रतिउत्तर देत तरुणाने तरुणीच्या पोटावर लाथ मारुन तिला पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नागपूरी गेट पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

पीडीत तरुणी २० सप्टेंबरला दुपारच्या सुमारास बहिणीच्या घरात एकटी होती. त्याचदरम्यान ती डोक्याला टॉवेल बांधून मोबाइल पाहत बसली होती. त्याचवेळी हा तरुण घरात घुसला व त्याने तरुणी सोबत अश्लील वर्तन केले. आकस्मिक घडलेल्या या प्रकाराने तरुणी घाबरली व संतप्त झाली. त्यावेळी त्या तरुणाच्या कानशिलात देवून ती तरुणी घरातच असलेल्या दुसऱ्या खोलीत गेली. आरडाओरड केला तसेच बहिणीला फोन केला.

काही वेळानंतर बहिण घरी आल्यानंतर पीडित तरुणीने घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी बहिणीने त्याला घरी बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणाला मी, मजाक करत होतो. त्यामुळे पीडीत तरुणीने त्याच्या आणखी दोन कानशिलात लगावल्या. यावेळी प्रति उत्तरात त्यानेही तरुणीच्या पोटात लाथ मारुन तुला बाहेर पाहून घेईल, अशी धमकी देवून घरातून पळ काढला. या प्रकारामुळे पीडीत तरुणीने नागपूरी गेट पोलिस ठाणे गाठून घरात घुसून तरुणाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, घरात अनधिकृतपणे प्रवेश करणे, धमकी देणे व शिवीगाळ करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...