आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या घरासमोर जीव देण्याची तरुणाची धमकी:तरुणीच्या आईला फोनवर केली शिवीगाळ

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्यासोबत लग्न न केल्यास तुझ्या घरासमोर येऊन मी आत्महत्या करणार, अशी धमकी एका तरुणाने शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीला फोनवरून दिली. तसेच तरुणी घराबाहेर पडली की, हा तरुण तिचा पाठलागही करत असल्याने या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध शनिवारी (दि. ५) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

अनमोल असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ४ नोव्हेंबरला अनमोलने तरुणीच्या आईच्या मोबाइलवर फोन केला. तिच्या आईने मुलीला बोलू देणार नसल्याचे म्हणताच त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीने आईकडून मोबाइल घेतला तर त्याने तरुणीला सुद्धा शिविगाळ केली. माझ्यासोबत लग्न कर, जर लग्न केले नाही तर तुझ्या घरासमोर येऊन आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...