आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुढीपाडवा व आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकमल चौकातील ट्राफिक सिग्नलवर सुमारे २ मिनिटे पोळून काढणाऱ्या उन्हात उभे राहणाऱ्या वाहन चालकांना थंड सावली मिळावी, या उद्देशाने लोकसहभागातून दोन्ही डाव्या बाजूला ग्रीन नेट बांधण्यात आली. त्यामुळेच राजकमल चौकात उन्हा उभे राहण्याची सर्वसामान्यांची चिंता मिटली आहे.
राजकमल चौक हा शहराच्या हृदय स्थानी असून, येथे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सध्या पारा ४४ अंशांपर्यंत चढल्याने येथील ट्राफिक सिग्नलवर उन्हाचे चटके सहन करीत वाहन चालकांना उभे राहावे लागते. काही वाहन चालकांकडे तर लहान मुलेही मागे बसलेली असतात. तेही उन्हामुळे कासाविस होतात. उकाड्यापासून तसेच उन्हाचा कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने चौकातील दोन्ही डाव्या बाजुला वाहनचालकांच्या डोक्यावर सावली पडेल अशाप्रकारे मोठ्या ग्रीन नेट २५ हजार रु. खर्च करून बांधण्यात आल्या आहेत. रेल्वे पुलाकडून येणाऱ्या मार्गावर ३६ गुणिले ६० फुट तर गांधी चौकाकडून मनपाच्या बाजुने येणाऱ्या रस्त्यावर ३६ गुणिले ४० फुट अशा मोठ्या आकाराच्या ग्रीन नेट बसविण्यात आल्या आहेत.
या नेट फाटू नये म्हणून चहुबाजुंनी शिवून त्या मजबूत दोरीेने वर बांधण्यात आल्या. ग्रीन नेट बांधणाऱ्या कामगारांनाही त्यांची मजुरी देण्यात आली. शहरात याच सिग्नलवर सर्वाधिक वेळ थांबावे लागते. त्यामुळे वाहनचालक कासावीस होतात. याप्रमाणे इतरही जे सिग्नल असलेले चौक आहेत. तेथेही लोकसहभागातून जर अशाप्रकारे ग्रीन नेट बसविण्यात आली तर सर्वसामान्यांची रखरखत्या उन्हापासून रक्षण होईल, अशी भावना सिग्नलवर उभ्या वाहनचालकांनी व्यक्त केली.
लहान बाळ बघून राहावले नाही
एक जोडपे उन्हात राजमल चौकातील ट्राफिक सिग्नलवर थांबले होते. दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या हाती तान्हुला उन्हाने बेजार झाले होते. हे दृश्य बघून तत्काळ तेथे ग्रीन नेट लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी साहिल ऑप्टीकल व माजी नगरसेवक म्हणून मी पुढाकार घेतला. आम्ही स्वत:चे आर्थिक योगदान देत काही लोकसहभागातून नेट खरेदी केली व बसवली. त्यामुळे दुपारच्या रखरखत्या उन्हापासून नागरिकांचा बचाव होत आहे. अजय सारसकर, माजी नगरसेवक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.