आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना:अमरावती जिल्ह्यात 16 शेतकरी कुटुंबियांना 32 लाखांची मदत;अशा पद्धतीने घ्या विमा योजनेचा लाभ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यावर त्याच्या कुटुंबाला आधार देण्यायाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यापैकीच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही एक आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला 2 लाखाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबियांना सावरण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 16 शेतकरी कुटुंबियांना 32 लाखाची मदत देण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे.

असा मिळवा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ
राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे असे सांगण्यात आले आहे. याकरिता ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतर पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लगतील असे सांगितले आहे.

असे आहे मदतीचे स्वरुप
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

कोरोनामुळे योजनेली खीळ
अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ 16 शेतकऱ्यांच्या वारसांनाच ही रक्कम मिळाली आहे. अजूनही 105 शेतकऱ्यांचे अर्ज हे प्रलंबित आहेत. आता कुठे योजनेच्या माध्यमातून निधी वर्ग करण्यास सुरवात झाली असून, शिवाय उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांनाही लवकरच रक्कम अदा केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...