आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आज केले जाणार विसर्जन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश चतुर्थीला गणरायाच्या आगमनानंतर सर्वांना वेध लागले होते गौरीच्या आगमनाचे. सोनपावलांनी शनिवारी (दि. ३) तिचे आगमन झाले. अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी (दि. ५) महोरवाशीन ज्येष्ठा गौरींचे घरोघरी विसर्जन करण्यात येणार आहे. शनिवारी अनुराधा नक्षत्रावर प्रतिष्ठापना झालेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे रविवार (दि. ४) १६ भाज्या व चटण्यांसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू होती.

काही ठिकाणी त्यांचा रात्री जागर करण्यात आला. सोमवारी त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी सायंकाळी घरोघरी महालक्ष्मी कथेचे वाचन करण्यात येईल. अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर त्या आज निरोप घेणार आहेत. त्यामुळे एक दुसऱ्याच्या घरी जावून त्यांचे दर्शन घेतले जाईल. यानिमित्ताने महिलांचा हळदी-कुकू कार्यक्रमदेखील होईल. पंचागानुसार रात्री ८.०५ वाजेपर्यंत आरतीनंतर अक्षता टाकून महालक्ष्मींचे विसर्जन करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...