आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुचर्चित:तीन वर्षांपूर्वी कसबा खोलापुरात घडली होती घटना; शैलजा निलंगे खून प्रकरणातमारेकऱ्याला आजीवन कारावासाची शिक्षा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहुचर्चित जलाराम नगरमधील निवृत्त शिक्षिका शैलजा निलंगे हत्याकांडातील मारेकऱ्याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) यांच्या न्यायालयाने दोष सिद्ध झाल्यामुळे आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याचवेळी मारेकऱ्याला सहकार्य करणाऱ्या महिलेला सुद्धा दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी (दि. १२) निर्णय दिला आहे. प्रकरण घडले त्यावेळी शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

विधी सूत्रांच्या माहितीनूसार, धीरज अरुण शिंदे (३१, रा. जयंत कॉलनी, अमरावती) असे आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३० जानेवारी २०१८ रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जलारामनगरात घडली होती. जला रामनगरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या शैलजा ओमप्रकाश निलंगे (६०) यांना दोन मुली व एक मुलगा असून, दोन्ही मुली नागपूरला तर त्यांचा मुलगा हा जयंत कॉलनीत त्याच्या परिवारासह राहत होता. शैलजा यांचे पतीसुद्धा शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर शैलजा या घरी एकट्याच राहत होत्या. शैलजा निलंगे सेवानिवृत्त असल्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. दरम्यान, घटनेच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या घरातील एक खोली धीरज शिंदे याला भाड्याने दिली होती. शैलजा यांची बहीण प्रतिभा गिरीष हेगू (रा. जलारामनगर) या त्यांच्या घरापासून पाच ते सहा घरे सोडून राहतात.

३१ जानेवारी खटल्यात सरकारतर्फे सहायक सरकारी वकिल दिलीप तिवारी यांनी १५ साक्षीदार तपासले. घटनेच्या रात्री साडेदहा वाजता आरोपी शैलजासोबत त्यांच्या घराच्या मुख्य दारासमोर हजर होता, ही बाब अभियोजन पक्षाने सिद्ध केली. तसेच आरोपीने मृताच्या एटीएम कार्डचा वापर केल्याचे सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक पुराव्याद्वारे सिद्ध केले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरला. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालय (क्रमांक ३) चे न्यायाधीश निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयाने धीरज शिंदेला दोषी ठरवून आजीवन कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साधा कारावास तसेच अश्विनी टेकाडे हिला गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील दिलीप तिवारी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. संदीप ताम्हणे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून सुधाकर माहुरे व अरुण हटवार यांनी कामकाज पाहिले.

२०१८ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास शैलजा निलंगे यांचा भाडेकरू धीरज हा प्रतिभा हेगू यांच्या घरी गेला आणि त्याने सांगितले की, शैलजा निलंगे यांना आवाज दिल्यानंतरही त्या बोलत नाही आणि त्या उठल्या नाही. त्यामुळे प्रतिभा हेगू या शैलजा यांच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांना शैलजा या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या नाकातून व तोंडातून रक्त निघत होते आणि पलंगांवर असलेल्या उशी व चादरीला रक्ताचे डाग लागले होते, तसेच त्यांच्या बाजूला एक दात पडला होता. अशी तक्रार प्रतिभा हेगू यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला होता.

तपासात शैलजा यांच्या नावाने असलेल्या एटीएम कार्डचा उपयोग त्यांच्या मृत्यूनंतर दस्तुरनगर परिसरातील एटीएम बूथवर झाल्याचे आढळून आले. एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात धीरज शिंदे व एक महिला पैसे काढताना दिसून आले. या आधारे पोलिसांनी धीरज शिंदेसह अश्विनी मुरलीधर टेकाडे ऊर्फ अश्विनी रवी वानखडे (२६) या महिलेला अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर धीरजने शैलजा निलंगे यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर मौल्यवान वस्तू, एटीएम कार्ड व इतर दस्तावेज हे अश्विनीकडे ठेवण्यास दिले होते. या गुन्ह्याचा तपास फ्रेजरपुराचे तत्कालीन एपीआय बिपीन इंगळे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

बातम्या आणखी आहेत...