आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशर:जिल्ह्यात ‘किंगफिशर’ नामशेष होण्याच्या मार्गावर ; पक्षिमित्रांचे संवर्धनासाठी आवाहन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किंगफिशर हा देखणा पक्षी आहे. जिल्ह्यात आधी मोठ्या प्रमाणात आढळून यायचा परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो अभावानेच दिसून येत आहे. त्यामुळे पक्षी मित्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे. पक्षी निरीक्षक तथा अभ्यासक वैभव पिसोडे सांगतात की, किंगफिशर किंवा खंड्या, अथवा उडताना किलकीला आवाज करतो म्हणून गाव खेड्यांमध्ये त्याला ‘किल्कीला’ या नावाने ओळखले जातात. मात्र, हल्ली हे याची संख्या ही कमी झाली आहे. आधुनिकीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे किंगफिशरचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासोबतच इतरही पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पक्ष्यांची स्वतंत्र जनगणना केल्या जात नाही. त्यामुळे त्यांची नोंदी होत नसल्याचे पक्षी मित्र पिसोडे सांगतात. किंगफिशर पक्षी दिसायला खूप सुंदर असतो हा लहान आकाराचा पक्षी आहे. सामान्य भाषेत याला रामचिडिया किंवा किल्किला असेही म्हणतात. हा पक्षी मासेमारीत पारंगत असल्यामुळे याला किंगफिशर असे म्हणतात. किंगफिशर पक्ष्याचा बराचसा भाग तपकीरी रंगाचा असतो. या पक्ष्याचे पंख चमकदार निळ्या रंगाचे असतात. त्याच्या डोक्यावर निळा धागाही असतो या पक्ष्याचे पाय इतर पक्ष्यांपेक्षा लहान असतात आणि चोच चाकूच्या आकारासारखी लांब असते. किंगफिशरचे डोळे खूप धारदार आणि तीक्ष्ण असतात त्यामुळे हे पक्षी जास्त कालावधीसाठी पाण्यावरून उडू शकतात. हे पक्षी खूप चपळ आणि वेगवान असतात. किंगफिशर मुख्यत्वे उंचावरुन शिकार करतात. माशांची शिकार करताना ते पाण्यावर घिरट्या घालतात. जेव्हा त्याना मासे दिसतात तेव्हा ते त्यावर झडप घालून चोचीने पकडतात. हा प्रामुख्याने मांसाहारी पक्षी आहे. जे मासे शिकार करण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वांत प्रसिद्ध आहेत. या पक्षांच्या काही प्रजाती मासेमारी मध्ये तज्ञ आहेत, परंतु काही प्रजाती बेडूक आणि इतर उभयचर प्राणी, कृमी, गोगलगायी, कीटक, कोळी, सेन्डिपॉड्स, सरपटणारे प्राणी (साप) हे खातांना दृष्टीत पडते. मात्र, वाढत्या शहरीकरण, जंगल तोड, नद्या, नाल्यांना पाणी नसणे, पोषक वातावरण न मिळाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या दोन वर्षात जिल्ह्यात जवळपास ६० किंगफिशर मृत अवस्थेत आढळुन आल्याचे पिसोडे यांनी तशी नोंद करून ठेवली असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...